**आयुर्वेद जनजागृती अभियान कार्यक्रम संपन्न**

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग महाराष्ट्र शासन व आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य द्वारा पुरस्कृत आयुर्वेद जनजागृती अभियान कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा अमोना येथे दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ उषाताई गजानन इंगळे व उद्घाटक म्हणून अमोना गावचे सरपंच श्री प्रल्हाद इंगळे ,विशेष उपस्थितीमध्ये डॉ. संजय लोखंडे, डॉ. योगेश काळे, डॉ. पंढरी इंगळे, डॉ.विष्णू गिरी ,डॉ. शंतनु देशमुख ,डॉ.निरंजन काळे , डॉ. आशिष लांडगे , डॉ. भाग्यशाली हेंबाडे, डॉ. दुर्गा जराते ,डॉ. कोमल साखरे ,डॉ .वैष्णवी देशमुख, श्री उत्तमराव इंगळे माजी सरपंच अमोना ,श्री अंबादास मोरे ,श्री संतोष जायभाये, श्री विजय सुरडकर , श्री अरुण वानखडे ,सौ पूजा कैलास मोरे , श्री दिनकर इंगळे, श्री गजानन इंगळे ,श्री कैलास मोरे, मुख्याध्यापक श्रीयुत एम .डी . साळुंखे सर व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. पंढरी इंगळे साहेब यांनी केले. यावेळी विद्यार्थी व पालकांना आरोग्या विषयी जनजागृती होण्याच्या दृष्टीने डॉ. संजय लोखंडे साहेब तसेच डॉ.योगेश काळे साहेब ,डॉ. विष्णू गिरी साहेब यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक समस्या व त्यावर उपाययोजना याविषयी विद्यार्थ्यांची संवाद साधला. डॉ.पंढरी इंगळे साहेब यांनी जिल्हा परिषद शाळेसाठी 100 आयुर्वेदिक औषधी वनस्पतीची रोपे शाळेला भेट दिली. तसेच श्री विजय सुरडकर शालेय व्यवस्थापन समिती सदस्य यांचा वाढदिवस सर्वांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जगताप सर व आभार प्रदर्शन श्री जयस्वाल सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गंगाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था चिखली, स्व. सुनील रामसिंह चुनावले आयुर्वेद महाविद्यालय चिखली व ग्रामपंचायत अमोना तसेच शालेय व्यवस्थापन समिती अमोना यांचे सहकार्य लाभले . अल्पोपहारानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली.

Dr. Piyush M. Purohit
Nodal officer,
Ayurved Jan Jagruti Abhiyaan,
SRC Ayurved College Chikhali, Dist-Buldana.

Asha worker and Anganwadi sewika workshop

Gynaec and A.N.C camp

SWASTHVRITTA DEPT

(Ganpati festival)
Poster presentation
Date 26/09/2023
Coordinator Dr.Sanjay lokhande. PROFESSOR HOD SWASTHVRITTA DEPT
Dr.Ashish Pradhan
Lecture.